आजचा गड विशेष
मोरा
  • समुद्रसपाटी पासून उंची - १२९५ मीटर
  • पायथ्या पासून उंची - ४५० मीटर
  • जिल्हा - नाशिक
  • पायथ्याची गावे - मुल्हेर
  • अक्षांश/रेखांश - ७४.०६७२४९, २०.७५३५४६
मोरा हा मुल्हेरचा जोडकिल्ला आहे. मुल्हेर माचीवरून ह्या दोन किल्ल्यांमधील घळीकडे जावे लागते. इथून सरळ चढण घेत साधारण एक तासाभरात दोन्ही किल्ल्यांमधील भिंतीपर्यंत पोहोचता येते. डावीकडे मोराच्या माथ्यावर जाणाऱ्या खोदीव पायऱ्या दिसतात. ...
त्या वर्षी ह्या वेळी
मे १६७७,
नळदुर्ग व गुलबर्गा मुघलांकडे

आदिलशाहीला संपवण्यासाठी जमेल तितक्या प्रदेशावर मुघलांची सत्ता प्रस्थापित करण्याचा बहादुरखानचा प्रयत्न होता. त्याने ऑगस्ट १६७६ मध्ये नळदुर्ग किल्ला वेढला. हे कळल्यावर बहलोलखानाने त्या वेढ्यावर आक्रमण केले पण त्या युद्धात त्याचा मुलगा मारला ... संपूर्ण लेख वाचा
वेचक वेधक
शिवाजीच्या नौदलाचा पहिला तळ
शिवाजीचे पहिले नौदल कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्यातून बाहेर पडले. शिवाजी त्या काळातला पहिला नेता होता ज्याला आरमाराचे महत्व कळले होते. कल्याण-भिवंडी घेतल्यानंतर लगेच त्याने आरमारी जहाजे बांधण्यासाठी आदेश दिले. त्यामुळे नवीनच प्राप्त झालेल्या किनारपट्टीवर लक्ष ठेवणे सोईचे होणार होते.